आठवणीतल प्रेम
आठवणीतल प्रेम
आयुष्यभराची प्रेम शिदोरी
हृदयाच्या हरएक स्पंदनात जपली
स्वप्न फुलराणीचे धूसर होता
मन मयुराला तु आभासी दिसली //
प्रेम नव्हे हा खेळ जीवांचा
सातजन्मीच्या स्वार्गी रेशीम गाठी
झिडकारलेला धिक्कारलेला मी तरी
प्रित खुलते सुखद तुझ्या दर्शन भेटी //
उत्कट भावनांचा कल्लोळ कसा हा
सावरु आवरु हा वादळवारा
जखमी हृदयसागराला या कोठून
लाभेल शांत हळवा स्वप्न किनारा //
आठवाच्या मृगजळचा तुझ्या
करी उनाडी पाठलाग खरा
जन्मभर भटकेल असाच बेभान
प्रेमातच तुझ्या गुंतला जीव सारा //
डुंबतो आजही त्याच नदीत
जिचा थांग कळला नाही
आठवणीतल नितळ प्रेम माझ
ज्याचा घाव कुणा दिसत नाही //

