STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

3  

Shila Ambhure

Romance

आठवणीत तुझ्या

आठवणीत तुझ्या

1 min
318


रम्य एका सायंकाळी

ध्यानस्थ मी वृक्षाखाली

अवचित , मनोहर

आठवण तुझी आली.

 

पाहुनि समोर तुला

माझाच मी न राहिलो

मागोमाग तुझ्यापाठी

संमोहित मी चाललो

रमणीय त्या बागेत

हात तुझा माझ्या हाती

अधर जाहले मूक

नयन प्रेमे बोलती.

डोळ्यांच्या नील सागरी

आकंठ मी गं बुडालो

तुझ्यासवे चालताना

माझाच मी न राहिलो



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance