STORYMIRROR

bhavana bhalerao

Tragedy Others

3  

bhavana bhalerao

Tragedy Others

आठवणीनी जड झालेलं आयुष्य

आठवणीनी जड झालेलं आयुष्य

1 min
254

म्हातारे झालो आता दोघं 

जाणवतंय हल्ली मला 

कुकरच्या चार शिट्या झाल्या तरी 

ऐकु जात नाही तिला

उंचावरून ङबा काढताना 

गुङघा साथ देत नाही मला

चार पाहुणे जास्त आले तर 

तिची किती तारांबळ उडते 

मला पेपर वाचायला मात्र

पान आणि पान पुरते 

तिला मोबाईल रुचत नाही 

मला मोबाईल शिवाय काही 

दुसरे काही सुचत नाही 

पुर्वी सारखं हल्ली दोघांनाही 

चटकन उठवत नाही 

आठवणींनी जड झालेलं आयुष्य 

आता मात्र पेलवत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy