आठवणींची शाळा...
आठवणींची शाळा...
आठवणींची शाळा भरली,आठवले गुरूजी शिक्षक,
आठवणी विद्यार्थीच्या,आठवणीच झाल्या रक्षक
आठवणींची शाळा भरली,आठवणींच्या सूर-पारंब्या,
आठवणी मनात घाेळू,आठवणींच्या काढल्या खुब्या
आठवणींची शाळा भरली,आठवणीने गायले स्तवन,
आठवणी आठवून आठवून ,भरले विद्यार्थीचे मन
आठवणींची शाळा भरली,वाचले आठवणींचे पुस्तक,
आठवणींचा गिरवला धडा,आठवणीने भरले मस्तक