आठवणींची फुले
आठवणींची फुले
आठवणींची फुले बहरली
माया ममता प्रेमातुनी
गंध पसरला मनी माझ्या
अश्रु ओघळले नयनातुनी
आठवणींच्या फुलात वसला
गंध तुझ्या प्रीतीचा
मोहुनी गेलो तुझ्या प्रेमातूनी
जीव जडला मायेचा
आठवणी आल्या फुलांपरी
सुगंध दरवळला चोहिकडे
लागली पावलांची चाहूल
पाऊले फिरती माझ्याकडे
आठवणींची फुले येती
भेटण्या एका वळणावरी
आयुष्याची साथ देई
आठवणी जपल्या उरी
आठवणींनी फुलले
जीवन माझे स्वप्नापरी
झाला वर्षाव फुलांचा
सुगंध आला दारोदारी
