आठवणींचा पाऊस
आठवणींचा पाऊस
आठवणींचा पाऊस आज पुन्हा पडू लागला
नाजूक रुपेरी क्षणांचा कैफ पुन्हा चढू लागला
खांद्यावरती डोकं ठेवून सुख-दु:ख सांगितली होती
दोघांनी मिळून कितीतरी सुंदर स्वप्नं बघितली होती
एकमेकांचे हात धरुन प्रितफुलं जपली होती
दूर क्षितिजावर मनाने स्वतंत्र झोपडी बांधली होती
अचानक असं वावटळ उठलं, होतं-नव्हतं ते सारं लुटलं
प्रितफुलांचा पाचोळा झाला स्वप्नातलं माझं गावही तुटलं
आठवणींचे कडू घोट पिऊन मनातल्या मनात रडू लागलो
धुवाधार पडणाऱ्या पावसात आज एकटाच भिजू लागलो