आठवणी
आठवणी
न येता एकट्याच
कळप घेऊन येतात
काही हळव्या आठवणी
उगाच रडवून जातात
होताच सांजवेळ
काळोख घेऊन येतात
हलक्याच पावलांनी
खुळ्या मनाचे द्वार खोलून जातात
उजळून क्षण सारे
भूतकाळात घेऊन जातात
नकळत डोळ्यांना
ओलावा देऊन जातात

