STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Romance

3  

Namita Dhiraj Tandel

Romance

आठवणी (सुनीत)

आठवणी (सुनीत)

1 min
277

#SMboss#Task2

तुला सांगायचे होते शब्दांत,

पण ओसरले ते क्षण सोनेरी..

अन् भावना देखील झाल्या पानेरी,

आठवणींच्या छटा मात्र स्वप्नी अर्थांत..


शब्दांची फुलं स्नेहाने लाजली,

मनाच्या परडीत दरवळला गंध..

भेटीच्या ओढीचा कायम छंद,

आठवणींच्या धाग्याने माळ गुंफली..


तुझा निःशब्द अबोला जीवघेणा ऋतू असा,

मनाच्या उंबऱ्यापाशी येऊनी का छळतो मजला?

विरहाच्या पाऊलखुणा घेऊन जातोस जसा,

विसर पडतो का आठवणींचा तुजला?


हृदयाशी जडला प्रितीच्या नात्यांचा अवखळ वारा..

डोळे दाटून येताच होतो आठवणींचा व्यर्थ पसारा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance