आठ एप्रिल
आठ एप्रिल
ही च ती वेळ हाच तो क्षण
ते राव्या दिवशी आठवले
रा त्रीच्या रात्रीच बाबांनो
व्या धीने पलायन सुरू केले....
दि सताच क्षणी नष्ट करण्या कोरोना
व जनदार घरी राहण्याचा मंत्र दिला
सा ध्या गोष्टीतून हद्दपार करण्यासाठी
चि वट शत्रू हटविण्याचा निर्धार केला...
सु जलाम सुफलाम देश आपला
प्र सन्न चित्ते जीवन जगू इच्छितो
भा ग्यात कशाला आलाय लेकाचा
त डफडणारा नालायक कोरोना तुच्छतो....!
तेरावा घालूया या व्याधीचा
एकजूट होउनी संकल्पाने
हा समूळ नाहीसा होईल नक्की
घरी राहण्याच्या विकल्पाने..!
