STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Tragedy

2  

Shrikant Kumbhar

Tragedy

आत्मा... एक भरकटलेले जीव

आत्मा... एक भरकटलेले जीव

1 min
552

कोणी लिहली हे माहित नाही पण सत्याची जाणीव करुण देणार हे लिखान मला खूप आवडले...

म्हणून मी इथे सादर करतोय... जर आवडलं तर नक्कीच प्रकाशित करा... सर्व लोकांपर्येंत ही बाब पोहचू द्या...


आत्मा... एक भरकटलेले जीव


आत्महत्या केल्यानंतर खाली येऊन पहिले मी माझ्याच घरचे एक दृश्य...


खूळ लागलं बापाला स्वतः कानफटात मारून घेतोय,

फोटो कड बघून माझ्या, स्वतःलाच फार शिव्या देतोय...


केस सोडून फिरते आई वेडी झाली म्हणते गाव,

ती कोण विचारलं की, माझंच सांगते म्हणे नाव...


तस कारण मोठं न्हवत माझ्या त्या मरण्याच,

मलाच न्हवत भान तेंव्हा, असं काही करण्याचं...


रेल्वे खाली झोपलो, तुकडे झाले क्षणाला

घरचे म्हणतात गोळा करून आणलं तरी कुणाला...


पाहून हे सार पुन्हा मी मरत आहे,

चिमुकली बहीण माझी हल्ली फार झुरत आहे...


आत्मा नुसता भरकटतोय परत येता हि येत नाही,

त्या बापाची माफी घ्यायला,पुन्हा संधी हि देव देत नाही...


मी एकदाच मेलो पण घरचे रोज मरत आहे,

माझ्या फोटो समोर बसून विनवण्या करत आहे...


चुकला माझा निर्णय देवा माफी एकदा देशील का,

पुन्हा एक शरीर देऊन,माझ्या घरी मला नेशील का...


बापाला बिलगून रडावं म्हणतो,आईच्या पायात पडाव म्हणतो,

आयुष्याला न घाबरता,

 देवा पुन्हा एकदा लढावं म्हणतो ...

देवा पुन्हा एकदा घडावं म्हणतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy