आसवानी रोजच भिजते उशी
आसवानी रोजच भिजते उशी
परततो लवकरी म्हणूनी
ना आजवर तू आला
देवूनी घाव हा विरहाचा
सजणा सांग ना तू कुठे गेला?
रोज आठवण येऊनी तुझी
अश्रूंची माळ नयनात दाटते
प्रत्येक काळोखी रात्र ती
मी तुझ्या विरहात काटते
सांग ना डाव हा प्रेमाचा
असा तू अर्ध्यावरी का सोडला
मांडलेला संसार हा खुळा
क्षणात का तू असा मोडला
तुझ्या वेड्या आठवणीत
आजही भिजते असावांनी उशी
माहीत असूनही नाही येणार तू परतुनी
तरी एक वेडी आस धरुनी बसते मनाशी
