STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

आषाढ धारा

आषाढ धारा

1 min
274

आषाढाच्या प्रथम दिवशी

गोळा जाहले मेघ अंबरी

आकाशी चमकली चंचला

कडाड कडाड नाद करी


आला आला पाऊस म्हणता

सुरू जाहल्या पाऊस धारा

मेघ   गर्जती  धडाड  धूम

संगतीला सोसाट्याचा वारा


पशू, पाखरे,  धेनू, वासरे

हर्ष मनी सकलांच्या दाटे

शुष्क झालेले सरिता नाले

धावत सुटले त्यांच्या वाटे


कुहू कुहू कोकिळ गातसे

आम्र वृक्षाच्या डहाळीवर

गीत तिचे ऐकून घालावा

कवी मनाला कसा आवर


तृण बाळे गवताची फुले

शोभा जगताची खुलविते

सप्तरंगी कमान आकाशी

कवींच्या मनास मोहविते


महाकवी कालिदास दिन 

प्रथम दिवस आषाढाचा

स्मरण करू महाकवीला

नमस्कार त्यास पंडिताचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational