आशेचा किरण
आशेचा किरण
आशेचा किरण देतो उत्साह
हतबल झालेल्या माणसाला
मरणाची वेळ आली तरी डॉक्टरच्या
एका शब्दाने धीर येतो मनाला.
सकारात्मक असावा दृष्टीकोन
आणि प्रबळ असावी इच्छा
तेव्हाच संपादन होत असते
आपल्या मनातली ती सदिच्छा.
आली किती ही संकटे तरी
हिंमतीने करावा त्यांचा सामना
हिंमतच असते आशेचा किरण
मात करण्या त्या संकटांना.
बादशहा बिरबल कथेत
रस्त्यावरचा दिवा होता किरण
पाण्यात राहणाऱ्या गरीबाला
दूरचा दिवाच ठरला जीव धारण.
