आस
आस
भरवला मायेने जे
शेवटचा घास आता
जाहिर केले मनाने
उपवास आता
देणे तुझे दिले
तु शक्य सारे
मागु कसे मोकळे
आकाश आता
वाटे संवाद चालावा
रोजचा असा हा
भासवते जे घर घडी
आस-पास आता
जाळतो तुझा दुरावा
या मनाला
जवळीक होऊन गेली
श्वास आता
शंख, शिंपलं, फुलं, पाने
माझ्या मोलाचे
हवी कुणाला कुबेरा
ती रास आता
हसणे तुझे तु ठेव
आबाध गडे
सोसेन जे होईल ते
मी त्रास आता
हवे ते माझे सारे
मला मिळाले
राहिली ना कोणतीच
आस आता
