STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

3  

Sushama Gangulwar

Romance

आरसा

आरसा

1 min
624


तुझ्या अंतर मनाच्या आरशात 

पाहिले मी स्वतःला 

तुझे माझ्यावरचे नितळ नितळ प्रेम 

दिसले स्पष्ट माझ्या मनाला ......


तुझ्या खऱ्या प्रेमाची 

झाली मी दासी 

विचारते मी आरशाला

सांग दिसते मी कशी ?........


तुझ्या समोर येण्या आधी 

आरशात न्याहाळते मी स्वतःला 

माझेच प्रतिबिंब चिडवते रे 

बघ तुझ्या नावाने मला.......


सजते सवरते वेडी मी 

आरशापुढे सतत बडबडते 

काय ? बोलायचे तुला हे पण मी 

आरशा समोर सराव करते......


गंमत बघ कशी आहे 

आरशालाच मी सख्या मानते 

तुझ्या आधी गुप्त मनातील 

माझ्या भावना आरसा जानते......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance