आरोग्य
आरोग्य
जीवनाच्या प्रवासात
अनमोल हीच संपत्ती,
निरोगी शरीर असेल
तरच निकोप मनवृत्ती.....
चंचल लक्ष्मीच्या मागे
नकोच फसवे मृगजळ,
सुदृढ आरोग्यानेच येई
जगण्यासाठी खरे बळ....
सकस आहाराने होते
मनही मग सकस,
उत्साही , प्रफुल्लित
जगावे असे सरस.....
व्यायामाने धष्टपुष्ट होई
कांतीमय निखळ तन,
चिरतरूण सदा नांदूनी
आविष्कारमय सदा मन.....
करू सेवन सदैव आता
आरोग्यदायी आहाराचे,
प्रतिकार शक्ती वाढे याने
लोभ नकोत फास्टफूडचे....
या शरीराची कदर करूनी
आरोग्यदायी सवयी लावू,
अनमोल जन्म असा सदैव
सतेज जीवनज्योत जागवू....
