आपणच करायचे
आपणच करायचे
बोलताना कधी कधी
आपणच शब्द जड करायचे...
आक्रोशाच्या टाहोंना
आपणच अबोल करायचे...
समोर येता तू दाटून आल्या भावना
तरी त्यांना आपल्याच मनात जपायचे...
पाणावले डोळे डोहापरी जरी
डोळ्यातल्या अश्रूंना आपणच लपवायचे...

