आपले सुख
आपले सुख


आपल्या सुखाची चावी
दुसऱ्याच्या हाती दिल्यावर
दुःखाशिवाय पर्याय नाही
मग प्रवास सुरु होतो...
अपेक्षा, गरज, सवय,
आवडी व निवडीचा...
स्वार्थ आणि भावनांचा
मग आनंद आपला
बंद असतो त्याच्या तिजोरीत
किती समजावले मनाला
तरी असते ते त्याच्या कोंडीत
सुटका व्हावीशी वाटते
पण मन मात्र तिथेच घुटमळते
मन काबूत राहत नाही
पण अशक्य हे नक्कीच नाही
आपलाच भ्रम आहे तो
कारण आपणच आपल्याला विसरतो
म्हणून स्वतःकडे नव्याने बघितले
आणि आनंदाला मी...
माझ्याच सुखाच्या कोंदणात लपविले