आठवण...
आठवण...
मलाच तू सारखा आठवतोस का रे?
मलाच तुझी आठवण येते का रे?
विसरत नाही तुला कधी
तुझ्या स्वप्नात तरी मी येते का रे?
सारखे सारखे किती आठवू
मनात तुला किती साठवू
प्रेम तुझे नाही का मजवर?
सोबत करायची आहे आयुष्यभर....
आठवणींच्या साठवणीत
असतो तू नित्य
अतिरेक वाटला जरी
हे आहे सत्य.....
सारे खोटे पडू देत
माझे फुटकळ विचार
बोलून नाही दाखवत पण.....
प्रेम माझ्यावर तुझे अपार....