"मनाच्या तारा"
"मनाच्या तारा"
आजकाल खूप वरवर
बोलणं होत......
पण आतपर्यंत शब्दच
पोहचत नाही.
बोलण्याला बोलावुन
बोललच जात नाही.
नुसतीच शब्दांची देवाणघेवाण.....
मनाची हाक
आतपर्यंत पोहचत नाही
कॉइन टाकल्याप्रमाणे
फोनवरचे बोलणे
पैसे तर खूप आहेत....
सुट्टे नाही तर थांबले
मनातुन नाही तर
मुखातून बोलणे.
नुसतीच विचारपूस
आणि शब्दांचे टोमणे
थांबायला हवंय हे सारं
मगच जुळेल मनाची तार
मन निर्मळ, निर्भेळ आनंद
तेव्हाच न बोलताही होईल परमानंद.