"WITHOUT MAKE-UP"
"WITHOUT MAKE-UP"


हसणं किती छान आहे.
चेहऱ्यावरील शान आहे.
पैसे लागत नाही हसताना...
दुःख विरते स्माईल देताना.
हसण्याचे ते प्रकार किती
कधी स्वतःसाठी तर कधी दुसऱ्यासाठी.
कुणी पाठी तर कुणी समोर
कुणाचे मनात कुणाचे चोर.
कसेही असावे
पण प्रत्येकाने हसावे.
हसण्यात खोटेपणा नाही तर
स्वच्छंदपणे दात दिसावे.
एकच वाटते मला नेहमी
मुखवटा लावलेले हास्य नको.
थोडी ठीक आहे पण....
जास्त दुःखाची झालर नको.
विधात्याने दिलेला हा
अमोल ठेवा....
खळखळून,निखळ,सुंदर हास्याचा...
MAKE-UP चेहऱ्यावर कायम हवा.....