शिकवण...
शिकवण...
कोरोनाने काय दिले...
आऊटसाईड नाही तर
इनसाईड बघायला शिकविले
मनातले जाणून
जग बघायला शिकविले
एकट्याने नाही तर.....
सर्वांसोबत हसायला शिकविले
समज आलेली पण.....
समजुतदारपणा शिकविला
सहनशक्ती वाढवून
संयम शिकविला
वेदना वाढलेल्या पण.....
संवेदना शिकविल्या
माणसात न राहूनही
माणुसकी शिकविली
न भेटता, न घरी जाता
online विचारपूस केली
नुसतीच तत्त्वे न जाणता
ती आचरणात आणली
या रोगातही.....
"भगवंताचे" नाव घेऊन
जगायला शिकविले, आनंदाने
जगायला शिकविले....