STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

आपला महाराष्ट्र

आपला महाराष्ट्र

1 min
3.0K


जीवापाड सांभाळतो आपला महाराष्ट्र

मायमातीत खेळवितो आपला महाराष्ट्र


आभाळासारखी माया देतो आपला महाराष्ट्र

चारी दिशात धरतीच्या आपला महाराष्ट्र


दीन दुबळी त्यांची सेवा करतो आपला महाराष्ट्र

शेतकरी, कष्टकरी त्यांचा आधार आपला महाराष्ट्र


महाराष्ट्र मुक्तीचा लढा स्मरतो महाराष्ट्र

शहिदांचे स्मरण करतो आपला महाराष्ट्र


गुणीजन संतांचा वारसा जपतो आपला महाराष्ट्र

क्रांती सूर्यांचा आदर्श घेतो आपला महाराष्ट्र


महापुरुषांची कार्य स्मरतो आपला महाराष्ट्र

अभिमान आहे जगात आपला महाराष्ट्र


जातीभेद,अंधश्रद्धा विरोध करतो महाराष्ट्र्

शिक्षणासाठी अखंड झिजतो आपला महाराष्ट्र


स्वच्छतेचा मंत्र शिकवितो आपला महाराष्ट्र

इतिहासाच्या पानोपानी आपला महाराष्ट्र


निसर्गाच्या कुशीत आपला महाराष्ट्र

डोंगर, नद्यांची सोबत आपला महाराष्ट्र


वृक्षवल्लीच्या संगतीने आपला महाराष्ट्र

समुद्राची असे मैत्री तिथे आपला महाराष्ट्र


प्रगतीच्या वाटेवर आपला महाराष्ट्र

एकतेसाठी अखंड लढतो आपला महाराष्ट्र


संस्कृती, संस्कार आपला महाराष्ट्र

विश्वविचार जपतो आपला महाराष्ट्र



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational