STORYMIRROR

Varsha Pannase

Inspirational

3  

Varsha Pannase

Inspirational

आणि शाळा बोलू लागली

आणि शाळा बोलू लागली

1 min
355

शाळेवर होती हसरी पाटी

मुलांना राहिल करोना सुट्टी 

शाळा म्हणाली मी कोणासाठी 

दुःख आले माझ्याच वाटी....


किलबिल किलबिल पक्षांची 

घंटा वाजे शाळेची

शाळा म्हणाली मुलांची 

मी नाहीच का कुणाची.....


नाही किलबिल नाही राडा

ओरड नाही गणित पाढा 

शिक्षक नाही शिकवत धडा

कुठे गेला प्राजक्त सडा.....


हसरी मुले पाटी गिरवी 

डबा गोष्टी होती हिरवी

आता लागली मलाच वाळवी

मीच आता अधीर बरवी...


जीव आसुसे पाहण्या मुला

कवेत घेण्या रंग फुला

कुठे हरवला चिमुकल्या पिला

या भेटाया क्षणात मला..........


दोष माझा काय गुन्हा

या शाळेत मजेत पुन्हा 

सरस्वती देते विद्या तुम्हा

देशाची धरोहर द्या मान आम्हा......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational