आण
आण
मरणावर माझ्या दोन फुले अश्रूंची ढाळ तू
नोंदवहीत तुझ्या नाव माझे हयात गाळ तू
चाहले तरी सोबत कायम देऊ शकलो ना,
माझ्याविना जगण्याचे दिले जे वचन पाळ तू -१-
शोक का करावा कुणी मी काय केले कुणासाठी
अचेतन काष्ठ झालेल्या देहास माझ्या जाळ तू -२-
व्यर्थ झाले जिणे माझे आयुष्य सारे वाया गेले
अखेर उमगले मी न कुणाचा प्रतिपाळ तू -३-
सरणावर माझ्या जळावे जे जे मा़झे स्वतःचे
वैधव्य खुणा नको ठेवूस पांढरे कपाळ तू -४-
