STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

आम्ही मुले

आम्ही मुले

1 min
538

आम्ही मुले भारतमातेचे

असू लाडके सर्वांचे

ज्ञान वृक्षाचे लावूनी

जीवन बनवू सुखाचे


विज्ञानाचा प्रसार करुनी

पाऊल ठेवू प्रगतीचे

एक झाड लावूनी 

धोके सांगू प्रदूषणाचे

आम्ही मुले भारतमातेचे

असू लाडके सर्वांचे


रोग सारे पळवूनी

धडे शिकवू स्वच्छतेचे

पाऊल पडती पुढे पुढे

मुळीच नाही घाबरायचे

आम्ही मुले भारतमातेचे

असू लाडके सर्वांचे


विकास होतो शिक्षणांनी

जनतेला हे सांगायचे

सक्षम नागरिक होऊनी

विकास करू या देशाचे

आम्ही मुले भारतमातेचे

असू लाडके सर्वांचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational