STORYMIRROR

Murari Deshpande

Tragedy

4  

Murari Deshpande

Tragedy

आले बरसत काळे मेघ

आले बरसत काळे मेघ

1 min
262

आषाढाच्या पहिल्या दिवशी

आले बरसत काळे मेघ

त्या पटलावर सौदामिनीने

उमटविली चंदेरी रेघ


हर्षित झाली जरी प्रेयसी

साजण गेला बराच दूर

आकाशातून जलधारा अन्

नयनी मावेना हा पूर


अशाच समयी हवास तू रे

जवळ मला पण हाय नसे

तुझ्या मिठीची स्वप्ने पडती

ना घडते प्रत्यक्ष तसे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy