आला ' वसंत ' ऋतुराज !!
आला ' वसंत ' ऋतुराज !!
आनंद देण्या मनामनास
सुगंध पसरवण्या वातावरणात
प्रसन्न करण्या तन-मनास
आला बहरुनी वसंत ऋतुराज !!
हिरव्या कोवळ्या पानांचा साज
देवूनी सार्या वृक्ष-लतास
देण्या सार्यांना आल्हाद-उल्हास
आला बहरुनी वसंत ऋतुराज !!
लेणं लेवुनी मोहोराचं खास
आमराई बहरली पानापानात
दंग होवुनी या निसर्गात
कोकीळ गाई मधूर सुरात
गोड अनुभूती ही सारी देण्यास
आला बहरुनी वसंत ऋतुराज !!
डोलून करिती पिके जणू नाच
बळीराजाही सुखवी मनात
सृष्टीवर करण्या चैतन्य पहाट
आला बहरुनी वसंत ऋतुराज !!
वसुंधरेच्या भव्य निसर्गात
छेडुनी आपल्या सुस्वरास
सुखावण्या सार्या चराचरास
आला बहरुनी वसंत ऋतुराज !!
ऋतुराजाच्या स्वच्छंदी सहवासात
गुढी उभारुनी चैत्र पाडव्यास
करुनी नववर्षाची सुरूवात
बहर पर्वणी ही करण्या सृष्टीस बहाल
आला मनमोहक वसंत ऋतुराज !!
