आकाश तुमचे अन् आमचे !
आकाश तुमचे अन् आमचे !
एकच आहे तुमचे अन् आमचे आकाश,
एकच आहे सूर्य अन् एकच प्रकाश
का आहे तुम्ही मग खासम खास आणि झकास?
अन् आम्ही असे शोषित, पिडीत, भकास
विस्तीर्ण छतावरून पहाता तुमचे आकाश,
चंद्रमौळीत येतो जो प्रकाश, तेच आमचे आकाश
आशा आकांक्षाचा आस्वाद असे तुमचे आकाश,
आमचे नभांगण जसा निराश, सावकाश प्रकाश
तुमच्याच कडे का आजन्म आशा, आराम, आरास?
तुमचाच चढता आलेख, आनंद, आवास व आशिष
नशीबी आमच्या सावकारी पाश, यथावकाश विनाश,
आमचाच दबतो आवाज, पेटते आग होई सर्वनाश!
एकच मागणे तुमच्यापाशी, द्या आमचा आमचा प्रकाश,
नको सारे तारांगण द्या फक्त आमच्या हिश्श्याचे आकाश
