आजी होती का गं कृष्णाची?
आजी होती का गं कृष्णाची?
खूप प्रश्न पडतात गं आजी
देशील का मग उत्तर त्यांची?
ठाऊक मज देवकी यशोदा पण
आज्जी होती का गं कृष्णाची?
खाण्यासाठी चोरून माखण
माखणका गं करी संवगड्यास गोळा?
खडी साखरेवरती आजी
देईन त्या लोण्याचा गोळा
घेऊन जाई माय यशोदा
उखळास बांधण्यास त्याला
धावूनी का गं गेली नाही
आजी सोडविण्यास त्याला?
कधी न ऐकले त्यास आजीने
दिला भरवूनी मऊ दुधभात
निळ्या मुखावरूनी का नाही फिरला
सुरकुतला थरथरता हात?
असेल मोठा देव पण तरी बघ
आजी त्याला नव्हती नक्की
म्हणून सांगते सर्वांना मी
कृष्णापेक्षाही मी आहे लकी
