आजही
आजही
शेतमालास साव मिळतात आजही
व कवडीमोल भाव मिळतात आजही
एकल खिडकी योजने च्याच आडून
दलालांचेच घाव मिळतात आजही
अन्न पिकवतो त्याच्या ताटी पाहता
जहर पुड्यांचे ठाव मिळतात आजही
बदनाम होय तलवार फार जाहली
सुऱ्यांना मात्र नाव मिळतात आजही
त्यात खतांचे दर वाढवले कशाला
धमन्यात उच्च स्त्राव मिळतात आजही
