आजचा विषय - दुष्काळ एक मोठी सम
आजचा विषय - दुष्काळ एक मोठी सम
भेगाळली भुई सारी
बळीराजा कष्टी होई
धान्य पिकंना शेतात
सावकाराचं कर्ज डोई
ऋतुमान ही बदलले
पर्जन्याची नसे खात्री
कधी पडेल संततधार
केव्हा लावेलच कात्री
रोपं वाळली शिवारात
सूर्यदेव की तापलाया
पोटात काटं का भरु
वरूणराजा कोपलाया
दुष्काळानं खंतावला
कसं दावू घरात तोंड
शिवार सारं सुकलंया
कापसाची काळी बोंडं
कारभारीण कष्ट करी
आणती ताजी भाकर
आसावली सारीजणं
मिळंना मायेची पाखर
सरकारनं माफ केलंय
डोईवरचं म्हणं हे ऋणं
विकासाच्या या सोयी
पोटाला मिळंनात दाणं
कर्जमाफी झालीय मान्य
मधल्या मध्येच लुटूनिया
जमाना आलाय खोट्याचा
काळीज येतया फुटूनिया
घ्यावा वाटतोय गळफास
काळजी फकस्त कुटुंबाची
कोण विचारील मागं त्यांना
वेळ येईल त्यांनाच भीकेची
