STORYMIRROR

Umesh Salunke

Romance

3  

Umesh Salunke

Romance

आज सकाळी मला

आज सकाळी मला

1 min
133

आज सकाळी मला

अचानक रस्त्याने जाताना

तुझ्या सौन्दर्याने नजरेला

घायाळ केले आहे.....


मला सारखं असं वाटतं आहे

तुझे डोळे सुखावणारे आहे

 त्यात वाहून जायचे आहे......!


तुझ्या श्वासात माझा श्वास

मिसळून बेधुंद होऊन

राहायचे आहे असाच अनुभव

घ्यायचा आहे....


तुझ्या चमकदार केसांत गंजरेच्या

सुगंधात मला मोहून पडायचे आहे.....

तुझ्या गुलाबाच्या पाकळ्या

सारख्या असणाऱ्या होठाना

आपलंसं करून गुंग होयचं आहे....


तुझ्या हातात हात घालून जाणवणारा

उबदार स्पर्शाने रोमांचित होऊन

मनमुराद जीवन आनंदित जगायचे

आहे....


तुझ्या आठवणी भेटेल तेव्हा

 अश्याच ताज्या लहरी

 पुन्हा बाहुपाशात रमवुन

 असंच प्रेम फुलवायच आहे....


  तू इतकं मला वेड केलं आहे

   सुरू होणाऱ्या थंडीला सुध्दा

   लाजवेल अशीं उपमा देऊन

    मला बर्फासारखं वितळवून

    टाकलं आहे.....


आज सकाळी मला

अचानक रस्त्याने जाताना

तुझ्या सौन्दर्याने आकर्षित

केले आहे.मी सर्वं स्वप्न

पाहिलं आहे.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance