आज कुणीतरी
आज कुणीतरी
जाता जाता आज कुणितरी
काळीज चिरून गेलय
एकांत सुध्दा खायला उठलाय
असे काहीतरी होऊन गेलय
नको नको झालय आता
सहन करण्यापलीकडे गेलय
जाता जाता आज कुणीतरी
काळीज चिरून गेलय
वादळ उठलंय डोक्यात
काहूर माजलय मनात
वाटले देखील नव्हते
एवढं एका क्षणात घडून गेलय
जाता जाता कुणीतरी
काळीज चिरून गेलय

