आनंदाचा क्षण
आनंदाचा क्षण
आयुष्यातला तो क्षण किती छान असेल
माझा हात जेव्हा तिच्या हातात असेल
स्वप्नांचा झुला नेहमीच मनात झुलत असतो
तिच्यासोबत असताना मीही बेभान असतो
दोघांचेही श्वास स्थिरावलेले असतात
माझ्या बाहुपाशात तिचे हात जखडेलले असतात
हळुवारपणे मने मग आमची बोलत असतात
आयुष्यतल्या त्या मधुर क्षणांचा आनंद लुटत असतात

