STORYMIRROR

Goraksha Karanjkar

Tragedy

3  

Goraksha Karanjkar

Tragedy

आई

आई

1 min
171

जाता जाता राहिलो मी

हसता हसता गेलीस तू मनात माझ्या ठेवून ओझे

देऊन गेलीस आयुष्य तुझे

  

होती गळ्यात तुझ्या तुळशीची माळ,

कशी तुटेल ग आपली ही भक्कम नाळ


मृदुंगाच्या ठेक्यावर डोलत होती तुझी मान,

दोन्ही हातांचे करूनी टाळ धरत होतीस तू ताल

कधी नाही समजला तुला तुझा स्वार्थ,

आयुष्य भर केलास तू नेहमीच परमार्थ

चेहऱ्यावरचं कळायचे तुला पाहुण्यांचे अंतर्मन,

वाटे लावताना मिळायचे त्यांना पुढचे आमंत्रण

शेवटी शेवटी एकटीच होतीस तुझी तू,

नाही कसला त्रास, नाही केलीस कसली इच्छा तू

जाता जाता राहिलो मी

हसता हसता गेलीस तू

 मनात माझ्या ठेवून ओझे

 देऊन गेलीस आयुष्य तुझे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy