आई
आई
त्या तिथे तिकडे पलिकडे
माय माझी गेली गडे
काळजाचे रेशीम बंध जपावे
याचे देऊन आम्हास धडे
परक्या त्या देशात निघाली
कळुही न देता कुणाला
स्वताचे ओझे पाठी मारुनी
निघाली पुढच्या प्रवासाला
अंगारे ते असे कितुके
तिने अंगावरती झेलले
दैवाच्या मात्र लिलेवरती
हात तिने टेकले
सैमालाही हाय घातले
अंधार पसरला चोहीकडे
आईच्या मात्र विनवण्या असतील
लक्ष असुदे मुलांकडे
तिच्या असण्याने अपुरे होते
आकाशही तिच्यापुढे
ती गेली अन् मजला आता
जगणेही मुश्किल पडे
आईची ती आर्त हाक
ऐकण्यास मी धडपडे
करुणेेने ती भरलेली होती
ती होती माझी माय गडे