आई
आई
कधी कधी वाटतो माझाही गर्व मला
आई तुझ्या पोटी जन्म घेतला मी तान्हा
अपशब्द नाही कधी तू उच्चारीले
तुझेच गुण जणु माझ्या अंगी बानीले
रूप तुझे सावळेसे नयनी मी पाहिले
सोडून गेलीस आज तू पण देव तुलाच मी मानीले
तूझ्या दुधाच्या पान्ह्याची नाही विसर पडली मला
खुप माणसे मिळाली पण माया न तुज सारखी कोणाला
कोनी न आज उरले मला, ध्यास जिवा एकची लागीला
पुर्ण करीन स्वप्न तवनयनांची, तेव्हाच घेईन मी झोप शांततेची
आशीर्वाद मला दे ग तूही, वंदिते चरण तुझी ही लाडकी
पुढचा जन्म देशिल का मला, राहिलेलं प्रेम करशील का पुन्हा?
