आई
आई
आई
मज आई
समान साई
कर्तृत्वाची नाही कमी
वात्सल्याची देते हमी
आईची मांडली अनेकांनी व्यथा
सरिता सागराने गायिली आईची गाथा
आई जहाली आम्हा नाथांच्या नाथा
आईच्या चरणी ठेवितो काव्यरूपी माथा
आई तुम्ही करुणासागर
वास्तल्य ,प्रेम , संस्काराच्या आगर
केलाय संस्काररूपी आम्हास जागर
आई जाहली आम्हा जीवनी चैतन्यरुपी घागर
आईने सोसलेले हाल आमुच्या ध्यानी
आई घर स्थापले माझ्या मनी
धन्य जाहलो लाभली आम्हा ईश्वर रुपी आई
आम्हा आईतच दिसतो राम कृष्ण अन् साई