आई
आई
आईची काय व्याख्या करू
आई माझी आद्य गुरु
आई इच्छांचे कल्पतरू
आई अळवाचं पाणी
आई दवाचा एक थेंब
आई सूर्याचे तेजस बिंब
आई खडगाची धार
आई हिमाहूनही गार
आई वाऱ्याची एक सळ सळ
आई हृदयाची हसरी कळ
आई आकाशाची एक अनंत पोकळी
आई माझ्या अवकाशाची साखळी
आई पौर्णिमेचा चंद्र
आई पाण्यातील प्रतिबिंब
आई महासागराचा तळ
आई गळ्यातील सोन्याची गळसर
आई प्रेमाचा आगर
आई मायेचा सागर
आई आरस्पानी पावित्र्य
आई जीवनाचा महामंत्र
आई आदिमाया आदिशक्ती
आई मनातली भक्ती
आई तुझी अपार माया
असावी निरंतर माझ्यावर छाया
माझे विश्व तिच्या पासून सुरू
आई म्हणजे साक्षात जगद्गुरु
