आई, तो कोण होता गं
आई, तो कोण होता गं
आई , तो कोण होता गं....
(अबोध बालिकेचा प्रश्न आणि
आईने दिलेले उत्तर)
लपाछपी खेळत असता
झाडामागे लपले गं
तोंड दाबूनी मला उचलले
आई, तो कोण होता गं
त्याच्या मिठीतूनी सुटण्यासाठी
धडपडले मी खूप गं
होते पकडले घट्ट मजला
आई, तो कोण होता गं
आडबाजूला नेऊन मजला
उघडेनागडे केले गं
छळले ज्याने खूप मला
आई, तो कोण होता गं
ओळखीचा ना पाळखीचा
का असे मग केले गं
रडू नको ना सांग मला
आई, तो कोण होता गं
कोण होता काय सांगू
नराधम तो होता गं
बलात्कारी त्यास म्हणती सारे
आजही खुलेआम फिरतो गं
