आई नतमस्तक तुझ्या चरणी
आई नतमस्तक तुझ्या चरणी
आई बद्दल काय मी लिहू हे मला कळतच नाही
आईसारखं प्रगल्भ व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कुठेही नाही
आई म्हणजे ज्ञानाचा सागर, संस्काराची सांगड, मायेची चादर
लेकरांच्या सुखासाठी ती देवापुढे नेहमीहीच पसरते पदर
आई साक्षर असो वा निरक्षर आई आईच असते
लेकरांसाठी हृदयही काढून ठेवायला ती तयार असते
आई म्हणजे काय हे आई झाल्यावर खऱ्या अर्थाने कळलं मला
निःस्वार्थ प्रेम म्हणजे आई ते क्षण अनुभवताना उमगलं मला
ज्याला कळली आई त्याने विश्वाचे दर्शन केले
जेव्हा तिच्या चरणी त्याने स्वतःचे मस्तक ठेवले .
