आई - बाबा
आई - बाबा
आई म्हणजे देवासमोरचा दिवा
बाबा म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश
आई म्हणजे अंगणातील रांगोळी
बाबा म्हणजे निळेभोर आकाश
आई म्हणजे मायेचे संस्कार
बाबा म्हणजे संस्काराची शिदोरी
आई म्हणजे आयुष्याचा मार्ग
बाबा म्हणजे त्या मार्गावरची वाटसरणी
आई म्हणजे वाक्य
बाबा म्हणजे त्या वाक्यातील शब्द
आई म्हणजे भाव कवितेचा
बाबा म्हणजे निशब्द
आई म्हणजे सूर्य
बाबा म्हणजे सूर्याची किरणे
आई म्हणजे विश्वास
बाबा म्हणजे आपल्यातला विश्र्वास हेरने
आई म्हणजे जिद्द
बाबा म्हणजे जिद्दीवरचा विश्वास
आई - बाबा शिवाय जगणे अपुरे
आई - बाबा विना सारे जग भकास
