आहोंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आहोंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात माझ्या आला तुम्ही
आयुष्य बदलून गेले सारे
अंगणी माझ्या नेहमीच असे
चंद्र आन लुकलुकणारे तारे
तुमच्या समवेत मलाही
मिळाला आपल्या गावी मान
संगतीत असता तुमच्या
कधीच नसतो कसलाच ताण
शिस्तही फार आवडीची
मोजकेच असते बोलणे
असतात मनी नवे विचार
नव्या पिढी संघ चालणे
दिसताना दिसतो स्वभाव कडक
टणक फणसाचे नरम गरे
सानिध्यात तुमच्या गेला वेळ
वाहतात फक्त प्रेम वारे
अशीच असावी तुमची
मला जन्मोजन्मी साथ
जन्मदिनाच्या देते शुभेच्छा
नेहमी असेलच हाती हात
नेहमीच राहील हातात हात

