आधार असावा?
आधार असावा?
जन्माला जरी ये एकटा होतो
समाजशील समाजात राहून |
आधार शोधतो कुणाचा तरी
एकटेपणात नैराश्य ये धावून | |१| |
आधार असावाच प्रत्येकाला
नसला तर मनात मळभ दाटे |
सोबत हवी कुणाची तरी जगी
नसता कुणाची साथ भय वाटे | |२| |
आधार मैत्रीचा आधार नात्यांचा
आधार हवा असे शेजाऱ्यांचा|
आजारपण, सुख दुःखात मानवा
गरज असे गर्व आधार देणाऱ्यांचा | |३| |