STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

4  

Dinesh Kamble

Tragedy

आभाळच फाटतं ग .

आभाळच फाटतं ग .

1 min
297

आजपासून जेंव्हा जेंव्हा 

तुला माझी आठवण येईल ..

डोळ्यात तुझ्या आसवांची नव्हे 

लाव्हाची साठवण होईल..


रोखू ना शकणार तू हुंदका 

कंठ सुद्धा जेंव्हा दाटून येईल..

तो विरह वेदनेचा भडका मग 

उरात तुझ्या पेटून येईल..


का ? ग का ? आलंय तुझ्या डोळ्यांत पाणी ? 

विचारपूस जेंव्हा करतील मैत्रीणी

तू बळस आणशील आव खोट्या हसण्याचा 

अन ऐकशील भलतीच मनघडण कहानी ..


पण तुला सांगू का ? 

तू लाख लपवले जरी प्रेम जमान्यापासून 

पण विसरू ना शकशील 

मला मनापासून ..


म्हणूनच मी सांगतो पुन्हा एकदा 

प्रेमात पडतांना सोप्प वाटतं ग ..

अन प्रेमातून उठायच म्हंटलं की 

जणूकाही आभाळच फाटतं ग .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy