STORYMIRROR

Sunjay Dobade

Romance

4  

Sunjay Dobade

Romance

अालीस तू प्रिये

अालीस तू प्रिये

1 min
17.2K



आलीस तू प्रिये

वाऱ्याची हलकीशी झुळुक होऊन

रोमांचली कोमल तृणे

सुखावली शहारली पाने

लाजली मोहरली सुमने

मन नाचतंय पिसागत हलकं होऊन


आलीस तू प्रिये

रंग अलौकिक प्रभेचे होऊन

उजळल्या या दिशा दाही

अंधाराला थाराच नाही

जीवनचक्र झाले प्रवाही

जीव सुखावला ऊन पिवळं लेऊन


तू आलीस प्रिये

सरितेचे शीतल जल होऊन

मनी हसला हा किनारा

आलिंगनाचा कळे इशारा

देहावरती उठे शहारा

चिंब ओला मी गेलो सुखात न्हाऊन


तू गेलीस प्रिये

उरलीस फक्त आठवण होऊन

श्वासाची गती होई मंद

हॄदय ठोके होती बंद

तरी जीवाला तुझाच छंद

मन सैरभैर झालं सखे तुला गमावून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance