52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
लागता चाहूल मृगाची
नभी दाटूनी येते ढग,
आतुरलेल्या बळीच्या
वाढते अंगातील रग.
काळी आई आसुसली
घेण्या कवेत पाऊस,
होऊनी लोचने व्याकुळ
करी मेघराजाचा ध्यास.
रखरखणा-या उनात होती
तहानलेली ही सारी धरा,
टपटप बरसता मेघराजा
हर्षाने सुखावती मृगधारा.
पडता अंगणी पावसाचे
सळसळ येऊन शिंतोडे,
मंत्रमुग्ध करुनिया सुगंध
दरवळ पसरतो चोहिकडे.
बीजांकुरे हळूच डोकावती
हलत डुलत शिवारातूनी,
मृगधारेत भिजूनी चिंब
नाचतो मयुर हिरवळीतूनी.
थंड गारवा पसरतो जेव्हा
खुलतो आसमंत हर्षाने,
नेसून हिरवा शालू जणू
निसर्ग बहरतो मृग वर्षाने.
