STORYMIRROR

vanita shinde

Classics

2  

vanita shinde

Classics

५२आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

५२आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
177

आहे स्वातंत्र्याचा हक्क

सर्व मानवा एक समान,

असो कोणतेही स्वातंत्र्य

माणुसकीचे राखावे भान.


नको गधा ती लादण्या 

कुणावरही पारतंत्र्याची,

मनसोक्तपणे जगताना

जाण असावी स्वातंत्र्याची.


ही मजा लुटताना कधी

स्वैराचाराची नसावी जोड,

एकजुटीने वावरताना

जिव्हाळ्याची असावी ओढ.


विसरुन सारे भेदभाव

स्वातंत्र्याचा घ्यावा आस्वाद,

आपुलकीने जोडूनी नाते

घालावी तयांना प्रेमळ साद.


स्वातंत्र्याच्या नावाखाली

नकोत जीवघेणे मतभेद,

सत्कर्म करुनी जगताना

दुष्कर्मालाही वाटावा खेद.


गुलामगिरीचे तोडून पाष

जपावा स्वातंत्र्याचा वसा

निर्भिड होऊन उमटावा

ख-या स्वातंत्र्याचा ठसा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics