2)पहिलं प्रेम..हूर हूर..!
2)पहिलं प्रेम..हूर हूर..!
गुलाबी थंडीत हूर हूर
वेगळीच जाणवत होती
कम्प शहारा अंगभर
नवीनच जाणवत होता
जाणायच होत मला
काहीतरी तिच्या मनातलं
धाडस करायचं होतं
पहिलं माझ्या जीवनातलं
चिठ्ठी चा घाट घातला
बोलके दोन शब्द लिहिले
आणि मागोवा घेत घेत
तिच्या क्लास चे ठिकाण गाठले
आज बी एस ए मला
वेगळीच वाटत होती
जणू ती तिखट मिरचीच
खायला उठली होती
कानोसा घेतला असा
वाटले जणू सारे विश्वच
पाळत ठेऊन बसले असावे
आणि सारे पितळ उघडे पडावे
शंका कुशंका घर करीत होत्या
हूर हूर भीती दाटत होती
शेवटी ठिकाण निश्चित केलं
आणि पायडलच्या बेचक्यात
पहिली चिट्ठी स्थानापन्न झाली
धूम ठोकून कोपरा गाठला
कानोसा घेण्या दबा धरला
म्हंटल प्रेम असेल तर ती
चिठ्ठी तिला पटकन मिळेल
ती आली ,तीन जाणलं असावं
तीन पटकन चिठ्ठी घेतली
मी जे पाहिलं ते परत परत
कधीच दिसणार नव्हतं म्हणून साठवलं
आजही अंगावर शहारा येतो
ते दृश्य किती लोभस किती बोलकं
साऱ्या विश्वाच सौख्य त्यात सामावलेलं
आणि मला पूर्णतया आपलस करणारं
पहिली नजर,पहिली चिठ्ठी
पहिली चकमक सार सारं
फक्त माझ्या साठीच होत
हे ही काही त्या काळी कमी नव्हतं
स्वर्ग दोन बोट,चारो उंगलिया घी में
देव छप्पर फाड के देता है
मैं तो मर गया
सार सार अनुभवलं.!

